दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड( वार्ताहर )
हिंदु नववर्ष निमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंग दल च्या वतीने मुखेड शहरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षीही हिंदु नववर्ष निमित्त गुढीपाडवा दि. २२ मार्च २०२३ रोजी येत असल्याने याच दिवशी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोभायात्रेची मुखेड तालुक्यात जय्यत तयारी होत असून विरभद्र मंदीर ते तेलीपेठ हनुमान मंदीर ते बसस्थानक या बाजारपेठतील दुकानांवर भगवे ध्वज लावण्यात आले असून शहरात भगवेमय वातावरण झाले आहे.
दिनांक २२ मार्च रोजी दुपारी सायंकाळी ४ वाजता मुखेडचे कुलदैवत विरभद्र महाराज स्वामी मंदीर पासुन या यात्रेला सुरुवात होणार आहे. या भव्य शोभा यात्रेला तालुक्यातील सर्व हिंदु बांधव एकत्र येऊन आनंदाने गुढीपाडवा व हिंदु नववर्ष मोठया उत्साहात साजरा करत असतात. या शोभायात्रेस मोठया संख्येने उपस्थित रहावे असे मुखेड विश्व हिंदु परिषद व बजरंग दल व संघ परिवार मुखेडच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या शोभायात्रेत सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारबाजी , साहसी खेळ, रुद्रुर येथील हलगी बाजा तर विशाखापट्टणम येथील देवी देवतांचे देखावे, साहसी कला व विविध देखावे हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
रामराज्य ग्रुप च्या वतीने दि.२२ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅली निघणार आहे. या रॅलीतही सहभागी होण्याचे आवाहनही संयोजकांनी केले आहे.