दैनिक चालु वार्ता माहूर प्रतिनिधी – विनोद भारती
दातांची तपासणी, फिजिओथेरपी शिबीर तसेच महाप्रसाद, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे आयोजन !
माहूर : श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन दिनांक 23 मार्च 2023 रोजी गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे सकाळी आठ ते दहा पूजा स्वामी चरित्र नित्यसेवा आरती व सकाळी 10.30ते सायंकाळी 5.30 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे प्रगट दिनाचे औचित्य साधून नांदेड रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नांदेड व नांदेड फिजिओथेरपी कॉलेज अँड रिसर्च सेंटर नांदेड यांच्या सौजन्याने गरजू रुग्णांसाठी मोफत दाताची तपासणी व शक्य असेल तर लगेच उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी गरजूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्याव असे आव्हान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर आयोजन समितीकडून करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या संस्थेतर्फे गेल्या दोन वर्षापासून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अविरत परिपूर्ण भोजनाची सेवा देण्यात येत आहे. आता तिसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे.(श.प्र.)