दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील पांढरकवडा खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार भाजपा मच्छिमार सेलच्या वतीने नुकताच करण्यात आला. परिसरातील लोकनेते व माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल चे अधिकृत उमेदवार व माजी सभापती रितेश परचाके यांचा खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी पुन्हा एकदा दणदणीत विजय झाल्याबद्दल दि.२० मार्च २०२३ ला त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा मच्छिमार सेल यवतमाळ जिल्हा सरचिटणीस प्रदीप ना.भनारकर व पांढरकवडा तालुक्यांतील भाजपा पदाधिकारी नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा
सत्कार करण्यात आला . अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत पांढरकवडा सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 13 पैकी भाजपा पारवेकर गटाचे 7 उमेदवार निवडून आले असून काँग्रेस प्रहार गटाचे 6 उमेदवार निवडून आले आहेत वैयक्तिक भागधारक मतदार संघाच्या चारही जागेवर भाजप पारवेकर गटाचे उमेदवार निवडून आले असून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये विजय पाटील चालबर्डीकर निलेश ठाकरे राम जिड्डेवार आय्युबखा तिघाले यांचा समावेश आहे अनुसूचित जाती जमातीचे मतदारसंघातून भाजप पारवेकर गटाचे रितेश परचाके निवडून आले असून त्यांनी काँग्रेस प्रहार गटाचे अर्जुन पुरके यांचा 83 मतांनी पराभव केला महिला मतदारसंघाच्या दोन जागेपैकी एका जागेवर काँग्रेस प्रहार गटाच्या वैशाली पडोळे तर दुसऱ्या जागेवर भाजपा पारवेकर गटाच्या कलावती पाटील निवडून आल्या इतर मागासवर्गीय मतदार संघाच्या एका जागेवर काँग्रेस प्रार गटाचे जयवंत बंडेवार निवडून आले असून त्यांनी भाजप पारवेकर गटाचे अरुण वातीले यांचा 96 मतांनी पराभव केला वि.जा.व भटक्या जमाती मतदार संघातून काँग्रेस प्रहार गटाचे कैलास चव्हाण निवडून आले त्यांनी भाजप पारवेकर गटाचे विनेश राठोड यांचा 6 मतांनी पराभव केला.