दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – आजच्या जीवनात शिक्षण हे काळाची गरज आहे त्या करिता आवश्यक साधन तितकीच महत्त्वाची आहेत.शाळा इमारत शासकीय असो अथवा खासगी असो शाळेत शैक्षणिक विकासा सोबतच शाळेचा भौगोलिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी म्हसळा तालुका जिजामाता शिक्षण संस्था मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.संस्था अध्यक्ष माजी सभापती महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या शाळा इमारत उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते अधिकपणे सांगताना आजची लोकसंख्या पहाता सार्वजनिक विकासासाठी आवश्यक लागणारा शासकिय निधी आणि शासन स्तरावर मिळत असलेला शासकीय निधी अपुराच पडत असतो या साठी स्थानीक ठिकाणी लोकसहभागातून विकासकामांत हातभार लावण्याची गरज आहे.समाजात अनेक दानशूर व्यक्ती मत्व सामाजिक सार्वजनिक विकासासाठी सढल हस्ते मदत करीत आहेत त्यांच्या संपर्कात आलो तर सहज साध्य करता येईल.नैसर्गिक आपत्ती,तोक्ते वादळ,महाड येथील पुर परस्थितीत शासन निधी बरोबरच मदत स्वरूपात अनेक दानशूर हात पुढे आले आणि शाळा,अंगणवाडी इमारती उभ्या झाल्याचा अनुभव सांगताना निसर्गाचा बदल पहाता सर्व शाळांनी हार्वेस्टिंग वॉटर प्लॅन,सौर यंत्रणा,वृक्ष लागवड आदी निसर्गावर आधारीत साधनाचा उपभोग घेतला पाहिजे.समाज सेवक रायगड भुषण पुरस्कर्ते कृष्णा महाडीक यांच्या संकल्पनेतून त्यांचे विशेष सहकार्याने दानशूर समाजसेवक प्रेमलता नागरथ-पंजाब,विक्रम शाह-गुजरात,कमलेशभाई मेहता-गुजरात,विरेंद्र शाह- शाह-गुजरात यांच्या अर्थसह्याने त्यांचे उपस्थितीत शाळा इमारत उद्घाटन करण्यात आले.सुंदर आणि सुबक बांधकाम केलेल्या शाळा इमार उद्घानप्रसंगी पुणे येथील उद्योजक रुपेश पेलीपाडा,इब्राहीम सिद्दीकी,गट विकास अधिकारी बी.एस.पोळ,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे,डॉ.प्रशांत गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिप माजी सभापती बबन मनवे,सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष संजय खांबेटे,संचालक,माजी नगराध्यक्ष दिलिप कांबळे,मनोज नाक्ती,लक्ष्मण कांबळे,ॲड मुकेश पाटिल,सरपंच इरशत फकीह,माजी सरपंच रियाज फकिह सरपंच सोनल घोले,सरपंच वनिता खोत,जिल्हा चिटणीस रेश्मा काणसे,निलेश मांदाडकर,न्यु इंग्लिश स्कूल प्राचार्य प्रकाश हाके,समाजसेवक शेखर खोत,महेश घोले,प्रदिप कदम,उदय कळस,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गोविंद भायदे,गाव अध्यक्ष कानु नाक्ती,इमारत कारागीर श्री पांचाल आदी मान्यवर पदाधिकारी,विध्यार्थी,शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नुतनीकरण करण्यात आलेल्या शाळा इमारतीत छोटेखानी मंदिरात विद्या देवता सरस्वती आणि सुख-दुःख तारणहार श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.इयता ८ वी,९ वी आणि १० वी करिता सर्व सोईनिशी स्वतंत्र शाळा गृह, कार्यालय,संगणक कक्ष,भंडारगृह,मुला-मुलींना स्वच्छता गृह,पानपोई,भव्य क्रीडांगण,भव्य व्यासपीठ आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.२२ वर्षा पूर्वी विना अनुदानित शाळा संस्था स्थापन का करावी लागली आणि इतकी वर्षे शाळा व्यवस्थापन करण्यासाठी कशा प्रकारे संघर्ष करावा लागला याचा इतिहास संस्था प्रमुख महादेव पाटील यांनी प्रास्तविकात आज समाज सेवक कृष्णा महाडिक यांच्या रूपाने शाळा इमारतीचा पुनर्विकास पहायला मिळाला आहे आणि शासन आदेशानुसार २०% अनुदान देण्यात येणार असल्याने नव वर्षाच्या गुढी पाडव्याच्या दिनी दुग्धशर्करा योग आला असल्याचे मनोगता मधुन सांगितले.सुंदर आणि सुबकपणे पार पडलेल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष महादेव पाटील यांनी,सुत्र संचालन संदिप सुतार,लाड सर यांनी आभार मुख्याध्यापक संदिप कांबळेकर यांनी मानले.