दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
पुणे मराठवाडा मित्रमंडळाच्या
शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी- प्राध्यापक देवाण-घेवाण करारच्या अंतर्गत श्रीलंकेच्या कोलंबो विद्यापीठात काही दिवसाचे शिक्षण घेवून भारतात परतले. या मध्ये कळंब येथील प्रफुल्ल दिलीप टोणगे यांचा हि समावेश होता.
महाविद्यालयाचे संबंध अधिकारी डॉ. सौरभ उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पवार, सायंक भोसले, दिव्या पाटील, आदिती काळभोर, ऐश्वर्या कुलकर्णी, अनुशिता दुबे, कळंब येथील प्रफुल्ल दिलीप टोणगे,यांनी श्रीलंकेमध्ये अन्वयार्थ न्यायालयीन कामकाज पद्धती, तेथील न्यायमूर्तीबरोबर संवाद साधून
न्यायशास्त्र, संविधान कायद्याचा अभ्यास व संशोधन करत केले. विद्यार्थियांचा गटने कोलोंबाच्या स्थळांना भेटी दिल्या, व तेथील न्यायमूर्ती चे मार्गदर्शन लाभले. अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.क्रांती देशमुख यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग श्रीलंका, श्रीलंका बार असोसिएशन, विधि या स्थळांना भेटी देऊन तुलनात्मक अभ्यास करणार आहेत .