दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – २४ मार्च २०२३ रोजी म्हसळा शहरात तालुक्यातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेस चालू करण्यात आले आहेत. या आयकॉन कॉम्प्युटर सेंटर चे उद्घाटन म्हसळा तालुक्याचे तहसीलदार मा. समिर घारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती एस एम सोनवणे पोलिस निरीक्षक, नाजीमुद्दिन चोगले , डॉ सालेह राऊत, माजी सभापती छायाताई म्हात्रे, दिगंबर टेकले प्राचार्य, एम एस तांबे प्राचार्य, मुबशशीर जमादार अध्यक्ष व्हिजन फाऊंडेशन, समाजसेवक महादेव पाटील, सादुल्ला आकलेकर, साजिद हूर्झुक,अनंत येलवे, ईमरान फकिह,नसिर मिठागरे , पत्रकार उदय कळस , बाबू शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते
मा तहसीलदार साहेब यांनी सांगितले की, आपल्या विद्यार्थ्यांना हाताला एक चांगल्या प्रकारे स्कील प्राप्त झाले पाहिजे, १०वी ,१२ वी शिक्षण घेत असता नाविन्यपूर्ण धावत्या युगाबरोबर शिक्षणाची गरज आहे आणि ती आयकॉन कॉम्प्युटर सेंटर म्हसळा येथून विकसित केले पाहिजे. सेंटरचे व्यावस्थापक सिकंदर आकलेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आतापर्यंत चार हजार विद्यार्थ्यांनी MS-CIT व इतर स्किल्स प्राप्त केले आहे. सध्या महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण अभियानांतर्गत विविध कोर्सेस अकाऊंट एक्झिक्युटिव्ह , डाटा एन्ट्री आॅपरेटर ,. ब्युटी थेरपिस्ट ,टेलरींग व सारथी योजने मार्फत मोफत विद्यार्थ्यांना कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत, आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. व इतर मान्यवर यांनी हि मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंकदर अकलेकर सर यांनी केले, सुत्रसंचलन हणमंत मोरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन जल्पा शहा यांनी केले.यावळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.