दैनिक चालु वार्ता आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): तालुक्यातील धाडी येथील महिलांनी कर्ज मंजूर फसवणूक प्रकरणाला गती मिळण्यासाठी आर्वी विधानसभेचे आ.दादाराव केचे यांना भेटून झालेल्या फसवणूक प्रकरणी व आष्टी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे याबाबत असे की, वरुड (जि. अमरावती) येथील फिन केयर मायक्रो फायनन्स बँकेच्या नावावर दोन भामट्यांनी १ लाख रुपये कर्ज मिळवून देण्यासाठी १५ महिला कडून प्रत्येकी ४ हजार ३५० रुपये वसूल केले आणि पोबारा केला सदर फसवणूक प्रकरणाची आष्टी पोलिसांना काही वर्णनात्मक पुरावे, आरोपीचे फोटो, भ्रमणध्वनी क्रमांक दिलेत मात्र आठवडा उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागेना त्यामुळे महिलांनी आ.
केचे यांच्या आर्वी येथील निवासस्थानी भेट घेऊन आपबिती कथन केली तेव्हा आ.
केचे यांनी आष्टी पोलिसांना विचारणा केली व या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून महिलांना न्याय देण्याची भूमिका विशद केली या पुढे सदर कर्ज फसवणूक प्रकरण काय वळण घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे