दैनिक चालु वार्ता भिगवन प्रतिनिधि :-जुबेर शेख
भिगवन रेल्वे स्टेशन हे इंदापुर तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असून या ठिकाना वरुण मोठ्या प्रमाणात व्यापारी, शासकीय कर्मचारी, नीम शासकीय कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, उच्च शिक्षित घेणारे विद्यार्थी वर्गमोठ्या प्रमाणात तसेच शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुणे या ठिकाणी दररोज ये-जा करत असतात. भिगवन रेल्वे स्टेशन वरुण इंदापुर,करमाळा, कर्जत, दौण्ड चा पश्चिम भाग या ठिकाना वरुण देखील लोक प्रवास करत असतात भिगवन रेल्वे स्टेशन वर मालधक्का देखील आहे येथून सीमेंट ची आवक मोठ्या प्रमाणात होते.
कोरोना महामारी नंतर भिगवन रेल्वे स्टेशन येथील हैदराबाद एक्सप्रेस, विजापुर एक्सप्रेस,पंढरपुर एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस अश्या महत्वपूर्ण एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आले ला आहे. आत्ता जनजीवन सुरळीत झाल्यानंतर देखिल तो थांबा पूर्वरत करण्यात आलेला नाही हे सर्व भिगवन रेल्वे स्टेशन येथील एक्सप्रेस चे थांम्बे पूर्वरत करण्यासाठी10 मार्च 2023 रोजी प्रदीप गारटकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष यांचा मार्गदर्शनाखाली सचिन बोगावत खजीनदार पुणे जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस तसेच रामहरी चोपडे अध्यक्ष प्रवासी संघटना, जुबेर शेख, सुरेश बिबे व गणेश घायाळ यांनीसोलापुर डीआरएम नीरज कुमार दोहरे यांची भेट घेतली असता त्यांनी सदरील रेल्वे गाड़यांचा पॉजिटिव अवहाल देऊन मुंबई येथे जनरल मैनेजर यांची भेट घ्यावी असे सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघ च्या खासदार सुप्रिया ताई सुळे,इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरने यांचा मार्गदर्शनाखाली सुरेश बीबे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस भिगवन स्टेशन, जुबेर शेख मा ग्रामपंचायत सदस्य भिगवन, रोहित मिसाळ, हनुमंत शेळके तसेच मलिक शेख यांनी 21 मार्च 2023 रोजी अमित कुमार मंडल सहा. उप महाप्रबंधक मुंबई यांची भेट घेऊन सर्व एक्सप्रेस चा थांबा पूर्वरत करण्या बाबत सकारात्मक असल्याचे सांगितले येत्या थोड्या दिवसा मधे आपला प्रश्न मार्गी लावून आपली होणारी गैरसोय यावर ठोस व कायम स्वरुपी पर्याय काढण्यात येईल असे आश्वस्त करण्यात आले.
“कोरोना काळात भिगवन स्टेशन येथील एक्सप्रेसचे जेवढे थांबे रद्द केले होते ते सर्व पूर्ववत करावेत अशी विनंती आम्ही सोलापूर आणि मुंबई ऑफिसला केली आहे आणि या मागणीला शंभर टक्के यश सुद्धा मिळाले आहे परंतु यातून सुद्धा काही समाधानी मार्ग निघाला नाही तर आम्ही दिल्ली ऑफिसला सुद्धा प्रयत्न करू व जे रेल्वे थांबे रद्द झाले होते ते पूर्ववत कसे होतील यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू”
– सुरेश बिबे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस भिगवन स्टेशन