दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई–साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय बीड मार्फत प्रकल्प मर्यादा रुपये 1, 00, 000 /- (एक लाख केवळ ) थेट कर्ज योजने अंतर्गत दिनांक 27 मार्च 2023 रोजी ठिक सकाळी 11. 00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह ( डी. पी. सी. हॉल) जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे मा. अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उप जिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड चिठ्ठयां व्दारे ( लॉटरी पध्दतीने) होणार आहे.
उक्त्वा योजने अंतर्गत दिनांक 26/12/2022 ते 20/01/2023 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आलेले आहेत. त्याकरिता एकुन 1154 कर्ज मागणी अर्ज प्राप्त झालेले असुन त्यापैकी 982 कर्ज मागणी अर्ज पात्र व 172 कर्ज मागणी अर्ज अपात्र आहे. पात्र कर्ज मागणी अर्जा पैकी पुरुष 631 व महिला 351 अर्जदारपात्रआहेत सदर योजनेचे 70 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट असुन त्यापैकी पुरुष 35 व महिला 35 कर्ज मागणी अर्जाची मा. अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उप जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिठ्ठयाव्दारे (लॉटरी पध्दतीने) निवड करावयाची आहे. बीड जिल्हयातील अर्जदारांना कळविण्यात येते की, आपण उपस्थीत रहावे पात्र अर्जदाराची यादी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे..