दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- कंधार तालुक्यातील
जिल्हा परिषद हायस्कूल काटकंळबा येथील विद्यार्थीची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थीनी कु. राजश्री प्रकाश बस्वदे, कु. धनश्री विजय गोरकवाड व विद्यार्थीआशित धनाजी चावरे यांचा सत्कारा निम्मित ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा येथे कार्यक्रम पार पडला. सत्कार गावचे सरपंच शिवाजी पा. वाकोरे, उपसरपंच अशोक चावरे, ग्रा.पं. सदस्य माधव वाकोरे, ग्रा. पं. सदस्य प्रतिनिधी जितेंद्र चावरे, गजानन कांबळे, गजानन कुठारे, विद्यार्थी पालक प्रकाश बस्वदे, विजय गोरकवाड, गावातील प्रमुख उपस्थिती लाभलेली मान्यवर श्री. मोहन पा. पवार, बालाजी पा. पानपट्टे, रामदास बस्वदे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. शिवाजी पा. बस्वदे, कपिल पा. बस्वदे, बालाजी कन्नेवार, काशीम पठाण, जलाल सय्यद आदी उपस्थित होते.