दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर -मोहन आखाडे
छत्रपती संभाजिनगर बजाज हाँस्पिटल नर्सिग काँलेज येथे
सेमीनार झाले. महाविघ्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थांयांनी अभुतपुर्व प्रतीसाद दिला. अध्यक्ष इंजि.अनंत मोताळे यांनी अन्न बचती बाबत अन्न नासाडी ही एक राष्ट्रीय समस्या झाली असून अन्न नासाडी कमी व्हावी म्हणून अन्न वाचवा समिती तर्फे गेल्या आठ वर्षां पासून शासकीय कार्यालये, महाविद्यालय, शाळा , लग्न कार्यालय,इत्यादी ठिकाणी अन्न नासाडी वर प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात. तिथेही प्रबोधन करण्यात येतात तर इंजि.अशोक पोरे यांनी पाणी बचती बाबत मार्गदर्शन केले.प्रास्ताविक नंदकुमार कुलकर्णी यांनी व संकल्प वाचन चंद्रकांत वाजपई यांनी केले.श्री नागेश गव्हले समीतीचे तरूण सदस्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्विते करीता मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास समीतीचे सचिव राजेद्र वाहुळे यांचे हस्ते नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुप्रिया चिंचपुरे मॅडम, चिंचोले, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व कमलनयन बजाज हॉस्पिटलचे प्रशासकीय विभागातील प्रविण कंगळे, यांना अन्न वाया घालू नये लागेल तेवढेच ताटात घ्यावे, अन्न नासाडी करू नये असा संकल्प सर्वांना देण्यात आला