दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) : तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालय अधिनस्त केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरळ नियुक्ती रिक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस पद भरती प्रक्रियेसाठी ३ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान कार्यालयीन वेळेत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त दै.चालू वार्ता च्या हाती लागले आहे तालुक्यातील पिलापूर ९५, मोई ८३,वडाळा ९१ आनंदवाडी ५३ या क्रमांकाच्या केंद्रात अंगणवाडी सेविका तर साहूर ६५,६८ पांढुर्णा ७१, तारासावंगा ७७,७८, माणिकवाडा
७९,जामगाव ८२, वर्धपुर ८९, रामदरा ४४, तळेगाव (श्या.पंत)३६,३८ भिष्णूर ५०, भारसवाडा ५५, खडकी ४९, बांबर्डा ६४, जुना अंतोरा २८,
देलवाडी ९७ लहान आर्वी २३, शिरसोली ६०, पेठ अहेमदपूर १५ चामला २१ ममदापूर २४ या अंगणवाडी केंद्रात मदतनीस पदासाठी २ फेब्रुवारी २०२३ च्या शासकीय परिपत्रकानुसार अर्ज आमंत्रित आहे सेविका आणि मदतनीस या पदासाठी स्थानिक रहिवासी,किमान बारावी उत्तीर्ण, वयोमर्यादा १८ ते ३५ तर विधवा उमेदवारासाठी ४० वर्ष, लहान कुटुंबाची अट अश्या अटी शर्ती आहे शिवाय भरती प्रक्रिया परिपत्रकानुसार पात्रताधारक उमेदवाराला कुठल्याही राजकीय वरदहस्ताची गरज नाही असे निर्गमित झालेल्या शासन निर्णयावरून लक्षात येते त्यामुळे गुणवत्ताधारक महिलांची अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर नियुक्ती होणार आहे एवढे मात्र सत्य.