दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : उद्धव ठाकरे यांची कोकणात सभा झाल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहे. रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा होणार आहे.
या सभेची तयारी नाशिक जिल्ह्यात जोरात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेसाठी नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. नाशिकमधून 100 बसेस अन् 15000 कार्यकर्ते सभेसाठी जाणार आहेत. नाशिक शहरातील वेगवेगळ्या विभागातून बसेस मालेगावकडे रवाना होणार आहे. परंतु त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. त्यामुळे सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना नाशिकमधून धक्का बसला आहे.