दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रा डॉ. तानाजीराव सावंत हे धाराशिव जिल्हयाच्या ३ दिवस दौऱ्यावर असून विविध विकास कामाचे लोकार्पण, शुभारंभ, शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी भूम येथे जनता दरबार वेळी आले असता माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय पवार, बाळासाहेब सुर्वे, रामभाऊ बागडे, बालाजी अंधारे तसेच विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठान पदाधिकारी, शहरातील नागरिक,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी,
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.