दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- अहमदपूर तालुका आरोग्य अधिकारी अहमदपुर च्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका योजने मार्फत दि.27/03/2022 रोजी आशा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
अहमदपूरचे मा. तहसीलदार साहेब मा.प्रसाद कुलकर्णी सर अहमदपूर,
ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.बिराजदार सर
या कार्यक्रमस अध्यक्ष मा.अमोलकुमार अंदेलवाड साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पवार सर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र अंधोरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ जयप्रकाश केंद्रे सर, प्रा आ केंद्र शिरूर ताजबंद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ शरद गिरी, नागरी दवाखाना रोकडा सावरगाव येथील तथा,प्रा आ.केद्र किनगाव वैद्यकीय अधिकारी रेचवाड सर, तसेच जिल्हा स्तरीय जिल्हा समुह संघटक श्रीमती संगीता डवरी मॅडम जिल्हा स्तरीय आशा गटप्रवृर्तक भाग्यश्री बनसोडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा आ केंद्र शिरुर ता.येथील आशा गटप्रवृर्तक रंजना गारोळे ,
सदर कार्यक्रमास सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व नियमित कार्यक्षेत्रात भेटी तसेच ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा कार्यकर्ती यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सन 2022-23 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांचा आशा पुरस्कार (सन्मान पत्र व सन्मान चिन्ह) देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमातंर्गत तसेच या मध्ये आशाचे सांस्कृतिक कार्यक्रम वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य , संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, प्रश्न मंजुषा, आशा व गट प्रवर्तक यांनी केले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्रीमती गारोळे मॅडम गटप्रवर्तक शिरूर ता. यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य विभागातील तालुका लेखापाल कपीकीरे सर, तालुका डाटा ऑफरेटर वाघमारे सर उपस्थित होते तर आभार प्रदर्शन तालुका समुह संघटक श्री. बानापुरे सर यांनी केले यांच्यासह या कार्यक्रमासठी गटप्रवर्तक यांनी परिश्रम घेतला