दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
वाघोली,चंदननगर ता.27. शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या सन्मान स्त्री कर्तुत्वाचा* या तळागाळातील महिला भगिनींच्या सन्मान कार्यक्रमास चंदननगर भागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सन्मानार्थी महिला भगिनींनी केलेल्या मनोगतातून खऱ्या अर्थाने कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याचे अधोरेखित झाले. तळागाळातील काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांची समाजात आवश्यकता आहे. कौतुक व कृतज्ञता व्यक्त करून समाजातील प्रत्येक स्त्री सक्षम करणं गरजेचं आहे. या वास्तवतेतून सर्व गोष्टींची अनुभूती सदर कार्यक्रमातून आली. कार्यक्रमात सौ सपनाताई शेख यांचे व्याख्यान अतिशय प्रभावी मार्गदर्शक ठरले. त्याचबरोबर जीवनविद्या मिशन केंद्र चंदननगर मधील सर्व कार्यकर्त्यांचे उत्तम सहकार्य लाभले. उपासना यज्ञाच्या रूपाने नाम व व्याख्यानाच्या माध्यमातून ज्ञानाचा सुवर्णसंगम झाला. कौतुकाची थाप व कृतज्ञतेची भावना यातून खऱ्या अर्थाने कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या संपन्न झाला. कार्यक्रमास हस्ते परहस्ते ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो व सर्वांना धन्यवाद देतो.
असे शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री बाळा भाऊ पऱ्हाड यांनी केले.