
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर/माढा:शिखर शिंगणापूर कावड यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ( गंगाखेड, बीड परभणी, लातूर,धाराशिव,) विदर्भातून शिंगणापूर कडे पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी नरसिंह प्रतिष्ठान,नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने टेंभुर्णी – अकलूज रोड येथील दि. शुगर फॅक्टरी, लि माळीनगर, टेंभुर्णी कार्यालयासमोर आज रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत टेंभुर्णी शहरात आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करून भाविकांना चहा, चिवडा-लाडू,थंड पिण्याचे पाणी असा अल्पोपहार देण्यात आला यावे नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.हा उपक्रम नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने गेले कित्येक वर्षे अखंडपणे चालू आहे आणि पुढेही अशीच चालू राहिल असे प्रतिष्ठानचे प्रमुख गणेश शिंदे यांनी सांगितले.