
दैनिक चालु वार्ता धर्माबाद प्रतिनिधी:- किरण गजभारे
धर्माबाद येथील उर्दू हायस्कूलचे च्या प्रांगणात मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे साहेब यांच्या आमदार स्थानिक निधीतून धर्माबाद उमरी तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक, आदिवासी sc आश्रमशाळा या शाळेला पुस्तक वितरण सोहळा धर्माबाद व उमरी तालुक्यातील शाळेंना करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी हे होते याप्रसंगी मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे साहेब सह प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राम पाटील बन्नाळीकर, उमरी पंचायत समिती माजी सभापती शिरीष गोरठेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वर्णी नागभुषण,ताहेर पठाण, रविंद्र शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जावेद सर उपस्थित होते मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आ. विक्रम काळे यांनी मराठवाड्यातील बहुतांश शाळांना, महाविद्यालयांना स्थानिक विकास निधीतून कोट्यवधींची पुस्तके भेट देण्याचा विक्रम केला आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळांना काळे यांनी विकास निधीतून पुस्तके वाटप केली. यावेळी धर्माबाद तालुक्यातील सर्व शाळा कॉलेजचे शिक्षक, प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांना पुस्तक वितरण करण्यात आले. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन उर्दु हायस्कूल चे अध्यक्ष जावेद सर, यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन हे उर्दु हायस्कूल चे मुख्याध्यापक महोम्मद अझरोद्दीन यांनी मानले…