
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्याचे मुख्यमंत्री डॉ.एकनाथ शिंदे यांचा पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमी मंदीरातर्फे मुंबईतील नंदनवनात सत्कार करण्यात आला आहे.
श्री साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील जन्मस्थानाचा विकास आराखडा लवकरात लवकर मंजूर करावा, असे साकडे या सत्कार निमित्ताने घालण्यात आले.
संस्थानचे अध्यक्ष ॲड. अतुल चौधरी आणि त्यांच्या टीमतर्फे हा सत्कार करण्यात आला. सत्कार समयी देण्यात आलेल्या बुकेंमधील फुलांच्या माध्यमातून सद्भावना व्यक्त करीत संस्थेचे अध्यक्ष व टीमतर्फे साकडे घालून श्री साईबाबांच्या जन्मस्थानाचा व नियोजित पवित्र क्षेत्राचा नियोजनबद्ध अशा विकास आराखड्याचे आश्वासन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून अपेक्षित केले आहे. कोणत्याही राजकारणाचा आडपडदा न ठेवता किंवा तो मतितार्थ या श्रध्दास्थानाशी न जोडता केवळ आणि केवळ लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असल्याची सद्भावना मनी बाळगून हा प्रश्न मार्गी लावला जावा, ही अपेक्षाच नव्हे तर खात्री असल्यानेच हे साकडे घातल्याचे समजते.
राज्यातील अनेक देवी-देवता व श्रध्दास्थानांच्या विकासासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी कोट्यावधींचा निधी व त्यासाठीचे प्रलंबित प्रस्ताव यापूर्वी व नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहेत. याचाच अर्थ धर्मस्थळांप्रति मुख्यमंत्र्यांची असलेली सौर्हादाची भूमिका स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा या पाथरी स्थानाचा राजकीय दूस्वास न करता लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी खात्री या भावनिक साकड्यातून दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये.