दैनिक चालू वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
कंधार / कंधार तालुक्यातील मौजे मंगनाळी व वरवंट येथील शिवेवरील जिओ टॉवर आठवड्यात चार ते पाच दिवस बंद राहते, नेहमी रेंज नसते तर कधी लाईट रहात नाही व त्या टॉवर आधारित असलेले गावे मंगनाळी, वरवंट,कळका, रहाटी, पेठवडज, बारूळ, व परीसरातील सर्व गावातील नागरिकांसाचे जिओ कार्ड असल्यामुळे लोकां ना फोन लावण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे तरी लवकर चालू करून लोकांना सेवा देण्यात यावे अशी मागणी सर्व गावच्या नागरिकांनी केली आहे. अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्यात येईल असे जनतेने जिऒ कंपनीला कळविले आहे.