दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:मुदखेड येथे
आज सकाळी दहा वाजता मुदखेड तालुक्यातील इसार पेट्रोल पंपा जवळील वळण रस्त्यावर नांदेड हुन भुतकर येत असलेल्या मालवाहू ट्रक आणि नांदेड कडे मुखेड होऊन जात असलेल्या ऑटोची समोरासमोर धडक म्हणून जागेवरच चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती असून इतर सात गंभीर जखमींना पुढच्या उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती त्या ठिकाणी उपस्थित घटनास्थळी प्रत्येक्ष दर्शनी सांगितले.
मुदखेड तालुक्यात मागील पाच महिन्या खाली अशाच एक अपघात होऊन त्या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि दिनांक 30 मार्च 2023 रोजी आणखी एक मुदखेड तालुक्यावर निसर्गाचा घाला झाला असून यात दोन वर्षाची मुलासह इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात महिला सरोजा भुई, अंजली बाई, जोयल भुई आणि पुंडलिक बळीराम कोल्हटकर राहणार सावरगाव माळ तालुका भोकर चारही मृत्यू पावलेल्या लोकांना मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणल्याची माहिती असून या अपघाताबद्दल शहरात हळहळ होत असताना मुदखेड तालुक्यात अपघातांची संख्या वाढल्याचे दबक्या आवाजात लोकांच्या होताना दिसत आहे घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सौभाग्यवती कमल शिंदे यांच्यासह मुदखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते घटनेची माहिती मिळताच मुदखेड शहरातील नागरिकांनी अपघातस्थळी मृत्यू पावलेल्या लोकांना अंबुलन्स मध्ये टाकण्यासाठी भीमराव पाटील कल्याणे,ऋषिकेश पारवेकर,शेख रिजवान, शेख इमरान भंगारवाले,शेख मोहसीन बागवान, खाजाभाई कुरेशी, यांच्यासह मुगट गावच्या नागरिकांनी अपघात स्थळी मदत केली.
*चौकट*
मुदखेड पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी हातात घेऊन शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना तात्काळ बंद करून वेगळी छाप टाकण्याचा प्रयत्न केला परंतू अवैध प्रवासी वाहतूक यातून सुटलेली दिसत आहे मुदखेड ते वाजेगाव रस्त्यावर आज सकाळी १० ते १०:३० च्या दरम्यान प्रवासी आटो क्रमांक एम एच २६ टी ७६९७ प्रवासी घेऊन नांदेडकडे निघाला ईजळीच्या पुढे असलेल्या मरीमाय मंदिराच्या वळणावर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या सिमेंटचा ट्रक क्रमांक एम एच २४ एबी ७०५९ या ट्रकला जोरदार धडक दिली यात ४ जण जागीच ठार तर ७ जण जखमी झाले आहेत यावेळी जखमींचा एकच हल्लकल्लोळ परिसरात ऐकू येत होता अपघात हा रस्त्यावरील खड्यामुळेच झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले.
मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे राजु वटाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे रामनवमीच्या बंदोबस्तासाठी नांदेड येथे गेले असून नुतन पोलीस उपनिरीक्षक कमल शिंदे ह्या जमादार बालाजी गीते, चंद्रशेखर मुंडे, विनायक मठपती, आदी फौज फाट्यासह घटनास्थळी उपस्थित राहून मयतांचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तळ ठोकून आहे.