
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील अंतरवली येथील विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदी पंढरीनाथ दशरत नाईकनवरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.अंतरवली येथे 13 सोसायटी चे संचालक बिनविरोध असून यामध्ये चेअरमन व व्हॉइस चेअरमन निवड बिनविरोध करण्यात आली.याप्रसंगी त्यांच्या निवडी बद्दल युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,गावचे सरपंच शिवाजीराव तिकटे,अंभी शिवसेना शाखा प्रमुख अविनाश गटकळ,गण प्रमुख जावेद तांबोळी,अनिल तिकटे,अनिल लेकुरावळे,विलास जाधव आदीनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.