
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/परळी –परळी शहरात मिळालेल्या गुप्त माहितीवरून आयपीएस धीरज कुमार यांनी स्वतः पत्याच्या क्लबवर मोठी कारवाई करत एकूण 29 जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून मोठी रक्कम जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. 29 बुधवार रोजी आयपीएस धीरज कुमार यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, परळी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या हमालवाडी येथे पत्त्याचा मोठा क्लब सुरू आहे. आयपीएस धीरज कुमार हे स्वतः आपल्या पथकासह परळीत सापळा लावत दिनांक 29 मार्च 2023 रोजी दुपारी साडे चारच्या दरम्यान हमालवाडी येथील पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली. यावेळी या ठिकाणी आरोपी बाळासाहेब महादेव बळवंत (रा. हमालवाडी, ता. परळी), ज्ञानोबा उर्फ बापू अनंतराव नागरगोजे (वय 63 वर्ष रा. शिवाजीनगर, परळी) दिलीप रामराव गडम (लातूरकर) (वय 60 वर्ष रा. विजय विश्वराज सिटी, लातूर), विठ्ठल गणपतराव भुसेवाड (वय 66 वर्ष उत्तर त्रिमूर्तीनगर, परभणी), नासेर शेरखान पठाण (वय 55 वर्षे रा. मलीकपूरा,परळी), सय्यद अमेर सय्यद जाफर (वय 44 वर्षे रा. पोट मोहल्ला, परळी), बाळू सर्जेराव आल्हाट (वय २८ वर्षे रा. मोगरा ता. माजलगाव जि. बीड), नामदेव तुकाराम कराड (वय 53 वर्ष रा. इंजेगाव, परळी), देवराव लक्ष्मण शिंदे (वय 50 वर्षे रा. लोणी, परळी) पांडुरंग राघोबा काळे (वय 38 वर्षे रा. सिरसाळा, परळी) चेतन त्रिंबक महाजन (वय 20 वर्षे रा. महाजन गल्ली सोनपेठ, ता. जि. परभणी), व्यंकटी युवराज राजळे (वय 35 वर्ष राहणार बोर्डा ता. गंगाखेड जि. परभणी), रतन रघुराम हजारे (वय 47 वर्ष रा. डीघोळ ता. सोनपेठ जि. परभणी), सुभाष गोपीनाथ जाधव (वय 40 वर्षेवर्ष रा. डीघोळ ता. सोनपेठ जि. परभणी), बापूराव रामभाऊ वगरे (वय 38 वर्ष रा. शिंदेवाडी ता. माजलगाव), बळीराम हरिभाऊ चव्हाण (वय 43 वर्षे वर्ष रा. डीघोळ ता. सोनपेठ जि. परभणी), शेख बशीर शेख फरीद (वय 58 बियाणी महामंडळ संजयनगर, परभणी), अनिल गंगाधर कंदे (वय 37 वर्षे रा. कोपरा ता. अहमदपूर जि. लातूर), शाम रामभाऊ माने (वय 49 रा. हमालवाडी ता. परळी), वैजीनाथ विश्वभर सुर्यवंशी (वय 45 वर्षे रा. कोपरा ता. अहमदपूर जि. लातूर), बालाजीसखाराम जाधव (43 वर्षे रा. वडर कॉलनी, परळी), मुसाखान शेरखान पठाण (वय39 वर्षे रा. कोमटवाडी ता. जि. परभणी), मासुम हमीद पठाण (वय 40 वर्षे रा. पोखर्णी ता. जि. परभणी), खलील अजेशखान पठाण (वय 34 रा. पोखर्णी ता. जि. परभणी), रवींद्र सुधार कदम (वय 26 वर्षे फकीर जवळा ता. धारूर), भारत किसन गायकवाड (वय50 वर्षे ता. संगम), केशव विश्वभर बलवंत (वय 83 वर्षे रा. हमालवाडी), रमेश केशव वाघ (वय 59 वर्षे रा. पोखर्णी ता. जि. परभणी), अशोक चंद्रभान बडे (वय 32 वर्षे रा. खाडेवादी ता. माजलगाव) या जुगाऱ्यांकडून यावेळी एकूण 17 लाख 93 हजार 270 रु. जप्त करण्यात आली असून परळी शहर ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम 4, 5 झाला असून पुढील तपास सपोनि. गोसावी करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस धीरजकुमार त्यांच्यासह पथकातील सपोनि अविनाश राठोड, अशोक नामदास, गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे आदींनी केली.