दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा नगर पंचायत हद्दीत निसर्गरम्य परिसरात वसलेल्या चिराठी आणि दुर्गवाडी गावालगत गावदेवी चिरेगाणी देवतेचे पुरातन मंदिर आसुन हे दैवत म्हसळा शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे.भक्ती व श्रद्दे सोबतच येथिल वातावरण पाहता स्थानिकांचे खास करून पर्यटनाचे आकर्षनीय स्थळ आहे.
येथील सुशोभिकरण करून पर्यटनिय विकास करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांच्या शिफारशीने नागरी सुविधा अनुदानातून २५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.याच बरोबर म्हसळा बौध्दवाडी मुख्य रस्ता विकास १६ लक्ष रुपये,बौध्दवाडी अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम १८.५ लक्ष रुपये,सावर बौध्दवाडी रस्ता ३६ लक्ष रुपये मंजुर करण्यात आलेल्या कामांचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या वेळी खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना शहरात विकसित करण्यात येत असलेली कामे दर्जेदार करण्यात यावीत.कामाचे दर्जाच्या बाबतीत कोणतीही हयगय केली जाणार नाही असे उपस्थित पदाधिकारी यांना सुचित करताना म्हसळा ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले चिरेगाणी देवतेचे मुळ स्थान जैसे थे ठेवून येथील निसर्गरम्य परिसर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सुशोभिकरण करून ते सर्वांना आवडेल असे सुतोवाच करताना हे काम पर्यटनिय दर्जाचे होण्यासाठी स्थानीक ग्रामस्थ मंडळाची कमिटी स्थापन करावी अशी सूचना केली.निसर्गाचे वरदान लाभलेल्या चिरेगाणी देवता मंदिर परिसरातील वातावरण पाहता भविष्यात शासनस्तरावरून पर्यटनिय “क”दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू असे खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जुन सांगीतले.विकासाचे बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या या भागात विकास कामांचे नियोजन करण्यासाठी आमदार आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे आणि मला अनेक वेळा दुर्गवाडी,चीराठी,चिरेगाणी येथे येण्याची संधी मिळाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपले माध्यमातून गेल्या १५ वर्षात येथील वाडी वस्तीचा खुपच विकासात्मक कायापालट होताना दिसत असल्याचे खासदार तटकरे यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले.आयोजीत भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाला खासदार तटकरे यांच्या समावेत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,नगराध्यक्ष असहल कादिरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,गट नेते संजय कर्णिक,जीप माजी सभापती बबन मनवे,पस माजी सभापती नाझीम हसवारे,मधुकर गायकर, महीला अध्यक्षा सोनल घोले,हिंदु ग्रामस्थ मंडळ सचिव सुशिल यादव,योगेश करडे,बाबु शिर्के,उदय कळस,संतोष सावंत,संतोष उद्दरकर,मंदार जोशी,गणेश हेंगिस्टे,नगर सेवक नासीर मिठागरे,शाहीद उकये,सलीम चोगले,नगर सेवक शाहीद जंजीरकर,नगर सेविका राखी करंबे,नौसीन चोगले,सरोज म्हशिलकर,करण गायकवाड,सतिश शिगवण,महेश घोले,नईम दळवी,समीर काळोखे,स्वप्नील चांदोरकर,संतोष मांडवकर, प्रकाश गाणेकर,गाव अध्यक्ष धोंडू बांद्रे,मुंबई अध्यक्ष सुभाष कदम,सचिव रघुनाथ बांद्रे,विनोद बांद्रे,केतन शिंदे,वसंत खोपरे आदी मान्यवर महीला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.