
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील शेकापुर येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भव्य बारशी यात्रा महोत्सव श्री शंभू महादेव यांच्या भव्य यात्रेला गुरूवार दि. ३० मार्च पासून प्रारंभ झाला आहे. या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल, कावडीचा कार्यक्रम ,कळस स्थापना व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्त्यांच्या लढतीत प्रथम विजयी पैलवानाना यात्रा कमिटीच्या वतीने बक्षीस मिळणार आहे.
शेकापुर येथे महादेव मंदिर असून हे मंदिर सर्व पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या देवस्थानास नांदेड, जिल्ह्यातील मोठा भाविक वर्ग दर्शनासाठी येत असतो.
यात्रा महोत्सवा ची सुरुवात दि. ३० मार्च रोजी झाली असून. 2 एप्रिल रोजी सकाळी पहाटे ५ वा महाअभिषेक व संध्याकाळी ७ वा कावडीचा कार्यक्रम व किर्तनकार श्री.ह.भ.प.प्रसाद महाराज गडदे आळंदीकर यांचे किर्तन आहे. सोमवार दि.३एप्रिल रोजी भव्य यात्रा व सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत कुस्त्यांची भव्य दंगल पार पडणार आहे. दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे किर्तनकार श्री. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पंढरपुरकर यांचे किर्तन पार पडणार आहे. दि ४ एप्रिल रोजी किर्तनकार श्री.ह.भ.प.सतिश महाराज पंढरपुरकर यांचे किर्तन पार पडणार आहे. दि ५ एप्रिल रोजी किर्तनकार श्री.ह.भ.प.सुरेंद्र महाराज गुह्राळकर यांचे किर्तन पार पडणार आहे. दि.६ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. कळसाची मिरवणूक ,सकाळी ८ ते ११ कळस पुजा व किर्तनकार श्री ह.भ.प.संत महंत गुरुवर्य एकनाथ नामदेव महाराज उमरजकर यांच्या हस्ते कळस स्थापना व काल्याचे किर्तन होणार असून तळ्याचीवाडी, संगमवाडी,पानशेवडी, जांभुळवाडी, गंगनबीड, पाताळगंगा, बिजेवाडी, आनंदवाडी, गोलेगाव, कंधार, उमरज, नागलगाव, व समस्त भजनी मंडळ शेकापुर आदी ठिकाणची भजनी मंडळी राहणार आहे. व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
या यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने व समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात येत आहे.