दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख असल्याने सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग चालू आहे, त्यातच आज इंदापूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष तानाजी भोंग यांनी ग्रामपंचायत मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत अजूनच रंगत वाढली आहे.
तानाजी भोंग हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेस वाढीसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि काँग्रेसचे विचार पुन्हा एकदा लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात.त्यांनी आजपर्यंत काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.तसेच त्यांचा इंदापूर तालुक्यातील सर्वच भागांमध्ये युवक वर्गात खुप मोठा जनसंपर्क आहे.महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख व घटक पक्षांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस काकासाहेब देवकर, काॅंग्रेस ओबीसी सेल इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे,इंदापूर तालुका काँग्रेस चे सरचिटणीस संतोष शेंडे, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत, विलास गायकवाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.