दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक ६ एप्रिल 2023 रोजी देगलूर पोलीस स्टेशन येथे आगामी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर सचिन सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक घेण्यात आली त्यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व मिरवणुकीमध्ये नियम व अटीचे सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर सचिन सांगळे यांनी मिरवणुकीमध्ये डी जे वाजवण्यास बंदी असेल त्या ऐवजी लेझीम पथक पारंपारिक वाद्यांचा वापर करा असे पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात ज्यांनी नियमाचा उल्लंघन करेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले . सदर बैठकीस माजी नगराध्यक्षा मोगलाजी शिरशेटवार, अँड मोहसीन अली, डॉ मुंडे, डॉ उत्तमकुमार हिंगोले, धोंडीबा कांबळे (मिस्त्री),कैलाश येसगे, सुशीलकुमार देगलूरकर, धोंडगे मॅडम,मानुरे मॅडम, पाटिल मॅडम इत्यादी मान्यवरांन सह १००ते२०० पदाधिकारी उपस्थित होते.