
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांची बुधवारी बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर आता सुंदर आत्माराम बोंदर देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशासक व म्हणून नियुक्त झाले आहेत.
कोरोना काळात देगलूर पालिकेत रुजू झालेल्या मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. शहरातील रस्ते, नाल्यांसह विकास कामे मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. घनकचरा व्यवस्थापन, शहराला सुरळीत पाणीपुरवठा ठेवण्याचा प्रयत्न केला. इरलोड यांची एकुणच देगलूर मधीलकारकीर्द सर्वसमावेशक राहिली आहे. इरलोड यांची बदली कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नसले तरी सुंदर बोंदरे हे देगलूर पालिकेत रुजू झालेत. बोंदर यांनी यापूर्वी कळंब, वसमत, कळमनुरी, भूम, परळी व लातूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहे. इरलोड यांचा जनसंपर्क चांगला होता. शहरातील मुलभूत सुविधा आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवारांसह सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय राखत प्रयत्न केले. पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर एक प्रशासक म्हणून त्यांनी चांगली भूमिका बजावली होती. देगलूर वासियांनी इरलोड यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.