दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/गेवराई– -परिवहन विभाग व महसूल विभाग यांचे मार्फत संयुक्त तपासणी मोहिम राबविण्यात आली असून संशयित अवैधपणे वाळु तस्करी करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई मध्ये एकूण 10 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सदर वाहन धारक यांचे कडून रुपये 2, 88, 500/- इतक्या रकमेच्या दंडाची वसूली करण्यात आली आहे…
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या निर्देशानुसार परिवहन विभाग व महसूल विभाग यांचे मार्फत संयुक्त तपासणी मोहिम राबविण्याताना तहसिलदार गेवराई यांचे सोबत आरटीओ विभागाने संशयित अवैधपणे वाळु तस्करी करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये क्रमांक नसलेली वाहने, रिफलेक्टर नसलेली वाहने, अवैधपणे वाळू वाहतूक करणारी वाहने तसेच मोटार वाहन कायदा1988 मधील रस्ता सुरक्षीततेच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन न केल्याने सदरची वाहने कार्यालयामार्फत ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली आहेत. तसेच यापुढे देखिल अवैध गौण खनिज वाहतुक करणारी वाहने रस्त्यावर आढळल्यास निरंतर कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची सर्व वाहन धारक यांनी नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वजिल माने यांनी कळविले आहे.