दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
नांदेड:-
नांदेड येथील स्वरगंध संगीत मंच नांदेड प्रस्तुत जुन्या व नवीन हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम नांदेड येथील कै .शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे नुकताच पार पडला. पण सदरील कार्यक्रमांमध्ये प्रणोती बिलोलीकर यांचे सुमधुर आणि उत्कृष्ट गायन नांदेडकरांना मंत्रमुग्ध करून टाकले. सदरील कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख निर्माते व संकल्पना साईनाथ लिंगाडे यांनी उत्कृष्ट नियोजन करून व त्यांच्या स्वतःचे गायनाने कार्यक्रमात रंगत भरली.
सदरील कार्यक्रम कै. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात आला. सदरील कार्यक्रमात एक से बढकर एक जुने आणि नवीन गाणे एकदम छान सादर करण्यात आली. अशी वेगळी मेजवानी नांदेडकरांना दिल्यामुळे नांदेडकर मंत्रमुग्ध झाले. जवळपास तीन तास झालेल्या या कार्यक्रमात सभागृह भरपूर प्रमाणात कार्यक्रमाचा आनंद घेत होता.
स्वरगंध कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना साईनाथ लिंगाडे यांची होती व दिग्दर्शन सुरजीत सिंग पुजारी व सुनील गुरु यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.
साईनाथ लिंगाडे व युगंधरा सांगवीकर यांचा साथिया तुने क्या किया व प्रणोती बिलोलीकर यांच्यासोबत चे युगल गीत अच्छा जी मैं हारी तसेच सुरज सिंग पुजारी यांचे छुप गये सारे नजारे ,दिन सारा गुजारा मीना सोलापूर यांचे युगलगीत कजरारे मोहब्बत वाला तसेच युगंधरा सांगवीकर व प्रणोती बिलोलीकर यांचा डोला रे डोला या युगलगीतासह सुरजित सिंग पुजारी व सुनील गुरु यांचे बने चाहे दुश्मन ही गीते एकापेक्षा एक सरस झाली. रंजीत भुयारे यांचे रिमझिम गिरे सावन व ऐसी दिवानगी या गीताने सुद्धा रसिकांची दाद मिळवली .डॉक्टर भारती मढवई – येवलीकर व संजय काचावार यांनी उत्कृष्ट निवेदन सादर केले.
कार्यक्रमास रामकृष्ण सुर्वे यांचे एलईडी स्क्रीन व नंदकिशोर गोदरे स्वामी यांचा संगीत संच उत्कृष्ट लाभला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास पारडीकर ,रामदास तारू रामचंद्र सांडवे ,भीमराव लोणे यांचे सहकार्य लाभले.