
दैनिक चालु वार्ता रिसोड प्रतिनिधी- आत्माराम जाधव.
रिसोड – भर जहागीर मार्गे मोहजाबंदी रोडचे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे रस्त्यात अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे तयार झाले असुन बस तसेच खाजगी वाहने, दुचाकी इत्यादी वाहन चालकांना वाहन चालविण्यासाठी अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. समोरून येणारे भरधाव वाहने रस्त्याची रुंदी आणी रस्त्यात अनेक ठिकाणी दगड, कच तसेच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
परिणामी वाहन चालकांना अपघात होण्याची जास्त भीती वाटत आहे.
संबंधित ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
संबंधित विभागाने रस्त्याचे ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि अशा प्रकारच्या ठेकेदारांना काळया यादीत समाविष्ट करावे.
संबंधित विभागाला नागरिकांनी वारंवार तक्रारी आणि निवेदन देवून रस्त्याची होणारी दुरावस्था दूर करावी. आणि प्रवाशांची होणारी गरसोय टाळावी.
अशी मागणी ग्रामस्थ करित आहेत.