दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
मळद
आज दिनांक 8/04/23
येरमाळा आणि तुळजापूर वरून देव दर्शन घेऊन परत घराकडे निघालेली खाजगी बस
सकाळी पहाटे पाचच्य सुमारास सोलापूर महामार्ग मळद , तालुका दौंड येथे प्रायव्हेटबसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे या बस मध्ये 57 प्रवासी बस मधून प्रवास करत होते बस चालकाचा बसवरुन ताबा सुटल्या मुळे रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यावर आदळून यादरम्यान या बसचा अपघात झाला.बस मधील प्रवासी गंभीर रित्या जख्मी झाले होते तर या अपघातात उपचारादरम्यान एका महिलेचा म्रुत झाल्याचे समजते मदतीसाठी 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास 108 यंत्रणेने 6 ॲम्बुलन्स घटनास्थळी पाठवल्या, एकूण 31 रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाल्या 108 ॲम्बुलन्स झोनल मॅनेजर विठ्ठल बोडके, जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे वेळेवर रुग्णास उपचार मिळाले या सेवेसाठी 108 च्या दौंड ,कुरकुम ,भिगवन, मोरगाव, वुमेन्स हॉस्पिटल बारामती लोकेशनच्या ॲम्बुलन्स घटनास्थळी उपस्थित होत्या
इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर-डॉ. नारायण येडे, डॉ. पद्माकर खुडे, डॉ. भरणे, डॉ. गायकवाड, डॉ.माने डॉ.हनुमंत अर्जुन उद्धव भगत, विनोद सुडगे, गणेश, विनोद सोनवणे , सकट,मोरे
अभिमानास्पद 108 ॲम्बुलन्स कार्य तात्काळ जखमी प्रवासाना उपचार मिळाला