दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे किरोडा येथील सेवा सहकारी सोसायटीवर लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या समर्थक पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे, किरोडा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे ,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. अशाताई शामसुंदर शिंदे, शेकापाचे मराठवाडा अध्यक्ष विक्रांत दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किरोडा सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आमदार शामसुंदर शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी लढवली होती, या निवडणुकीत आ. शिंदे समर्थकांच्या पॅनलने सेवा सहकारी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळवून विजय संपादित केल्या बद्दल नांदेड येथील आमदार शिंदे यांच्या स्मेरा निवासस्थानी नवनिर्वाचित चेअरमन व सदस्यांचा सत्कार व अभिनंदन करून आ. शिंदे व आशाताई शिंदे यांनी नवनिर्वाचित पॅनलला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, शेकापचे नांदेड जिल्हा अध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, शंकर माने, सुनील जोंधळे, शंकर जोंधळे, गजानन जाधव, सुशील जाधव ,अनिल जाधव ,बबन जाधव, भीमराव जोंधळे ,बळी जाधव ,दौलत जाधव ,मोनिका माने, साहेबराव माने ,तुकाराम जाधव ,गोपाळ जाधव, सह कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.