दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:शहर व परिसरात घरफोड्या ,दुचाकी, मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले 9 असताना दोन महिन्यापूर्वी पोलिस अधिक्षकांनी दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) आणि एका पोलिस उपनिरीक्षकाची (पीएसआय) बदली करण्यात आली. त्यांनंतर २ पीएसआय नव्याने देगलूर पोलीस ठाण्यात रुजू झाले मात्र. एकही सहाय्यक पोलीस निरीक्षक बदलीवर देगलूर ठाण्यात आले नाहीत. मध्यंतरी पोलिस निरीक्षक सोहम माछरे हे सुटीवर गेले असता उपनिरीक्षकाकडे पदभार दिला गेला होता. याबाबत बरीच चर्चा रंगल्याने आता माछरे पुन्हा सुटीवर गेले आहेत. त्यांच्या जागेवर नांदेड येथील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) कडे दि. ०८ एप्रिल रोजी रात्री देगलूर ठाण्याचा
पदभार देण्यात आला आहे. तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेवरअसलेले देगलूर येथील पोलिस ठाणे अत्यंत संवेदनशील आहे. सिमावर्ती भाग असल्याने गांजा, गुटखा, वाळू, शासकीय धान्याची मोठ्याप्रमाणात तस्करी होते. गुन्हेगार ही पळून जाण्यासाठी सिमावर्ती भागाचा वापर करतात.
तालुक्यात गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना रिक्त पदं भरली जात नाहीत. देगलूर पोलीस ठाण्यात असलेले श्री संगमनाथ परगेवार, श्री. प्रकाश माळाळे व पीएसआय श्री रविकुमार मुंडे यांची बदली करण्यात आली. एपीआय अपेक्षित होते. असलेले संगमनाथ परगेवार नांदेड आणि प्रकाश माळाळे बिलोली येथे यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले.
मात्र, पीएसआय असलेल्या रविकुमार मुंडे यांनी मुलांचे शैक्षणिक कारण समोर करुन बदली रद्द करुन घेतली. सध्या देगलूर पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक रजेवर गेले तर ठाणेसांभाळण्यासाठी एकही सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) नाही. दरम्यान, पोलिस निरीक्षक माछरे हे सध्या दि. ०९ एप्रिलपासून सुटीवर गेले आहेत.
ठाण्याचा कारभार पाहण्यासाठी नांदेड नियंत्रण कक्षातील येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय). विश्वंभर पल्लेवाड यांना शनिवारी रात्री पदभार देण्यात आला. दरम्यान, दोन एपीआय ची बदली केल्यानंतर देगलूर पोलीस ठाण्यात एक तरी एपीआय येणे
मात्र, पोलीस निरीक्षक रजेवर गेले तर नांदेडहून एपीआय ला कारभार पाहण्यासाठी पाठवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे… दरम्यान, देगलूर ला रिक्त झालेल्या दोन एपीआय च्या जागेवर नविन एपीआय देण्यात यावेत अशी मागणी जनतेतून दिवसागणीक जोर धरु लागली आहे.