
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सम्राट मित्र मंडळ व बौध्दनगर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 151 बाटल्या रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
सूरूवातीला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.तद्नंतर माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते फित कापून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.या वेळेस पुज्य धम्मगूरू भंते महाविरो थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती दिलीपराव देशमुख, अशोकराव केंद्रे, जीवनराव मद्देवाड, कुलदीप हाक्के,गोविंदराव गिरी,बालाजी गूट्टे,संग्राम नरवटे,रामभाऊ बेल्लाळे,मधुकरराव धडे,यांची उपस्थिती होती.
तर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,उपनगराध्यक्ष कलिमोद्दीन अहेमद, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे,श्रीकांतभाऊ बनसोडे, डॉ.ओ.एल. किंनगावकर,शेषेराव ससाणे ,मुकूंद वाघमारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विश्वंभर स्वामी, पत्रकार मेघराज गायकवाड,राठोड रमेश दैनिक चालू वार्ता पत्रकार,उदय गुंडीले,संदीप गूंडरे, रिपाई तालूकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर,हेमंतराव गुट्टे, सहदेव व्हानाळे, आण्णाराव सूर्यवंशी,मून्नाभाई कांबळे,अमित बिल्लापट्टे,संपन्न कुलकर्णी,अंगद सांगोळे, रवी कच्छवे आदींनी शिबीराला भेटी दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.तर सूत्रसंचालन बालाजी मस्के यांनी केले.
या उपक्रमासाठी प्रशांत जाभाडे,आकाश सांगविकर,अजय भालेराव,प्रदिप जाभाडे, सचिन बानाटे, राहुल गायकवाड, त्रिशरण वाघमारे,अजय भालेराव, राहुल गवळे, कैलास गायकवाड, बौध्दनगर येथील शरदभाऊ बनसोड, सिध्दार्थ वाघमारे,बबलु वाघमारे,विठ्ठल ससाणे, दिनेश तिगोटे,मिलींद कदम,राजविर मतकर, सुनिल तिगोटे, आकाश ससाणे,सुमित बनसोडे, अभय गायकवाड, सावळाराम बनसोडे, रोहित तिगोटे,राहुल वाघमारे, सुनिल ससाणे,सतिश कदम, संविधान कदम,सोनु कांबळे,आदींसह असंख्य कार्यकार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शन युवकनेते महेंद्र ससाणे यांनी मानले.