
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : रिसोड येथे दि. १३ एप्रिल गुरुवारला भाजपची भव्य संकल्प सभा होणार असून, सदर सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाशिम जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
मा. मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, आ. रणधीर सावरकर, आ.तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक,आ. तान्हाजीरराव मुटकुळे, मा.आ. विजयराव जाधव, आ. हरीश पिंपळे, विभागातील विधानपरिषद सदस्य, मा. आमदार, वाशिम जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, आदींच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला होता. तेंव्हा माजी खासदार अनंतराव देशमुख व एड. नकुल देशमुख यांनी भाजपाचे नेते उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना रिसोड~मालेगाव विधानसभा मतदार संघात सभा घेण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने रिसोड येथे वाशिम रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागील भव्य मैदानावर सदर संकल्प सभा सकाळी १० वाजता पार पडणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय धोत्रे, माजी खासदार अनंतराव देशमुख, प्रदेश महासचिव तथा आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, विधानपरिषद सदस्य वसंत खंडेलवाल, हिंगोलीचे आ. तान्हाजीराव मुटकुळे, मूर्तिजापूरचे आ. हरिष पिंपळे, विधानपरिषद सदस्य निलय नाईक, माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, मेडशीचे माजी आमदार विजयराव जाधव, भाजपचे युवा नेते ऍड. नकुल देशमुख, रिसोडच्या नगराध्यक्षा विजयमाला आसनकर, प्रदेश सदस्य राजु पाटील राजे, महामंत्री तथा जिल्हापरिषद सदस्य गजाननराव देवळे आदींसह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार असून, सदर भव्य संकल्प सभेस जिल्ह्यातील तमाम जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप नेते माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष गजाननराव लाटे यांनी केले आहे.