दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (नांदगाव खंडेश्वर) :- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव येथील सरपंच व सदस्य दोघांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
जलजीवन मिशन अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव येथे पाईपलाईन टाकण्यात आली होती.सदर काम ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली.जामगाव फाटा माऊली चोर परिसरात लाच स्वीकारताना आरोपी बबिता संजय खानंदे (वय ४३) व आरोपी पंकज हरिदास तळण (वय ३३) या दोघांना अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींना लोणी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक मारुती जगताप,एसपी अरुण सावंत,देविदास घेवारे,डीएसपी संजय महाजन शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएआय योगेशकुमार दंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कार्यवाही केली.