दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-शिवकुमार हिप्परगे
सावरगाव/ अहमद्पूर :
• युवकांचा उस्फुर्तपणे प्रतिसाद
• ६५ बाटल्याचे संकलन
श्री क्षेत्र परचंडा हे गाव लातूर जिल्ह्यामध्ये श्री रोकडोबा देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. येथे वार्षिक सप्ताहामध्ये समस्त गावकरी मंडळीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार श्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या गावच्या आदर्श सरपंच सौ शिवनंद राजेंद्र हिप्परगे तसेच गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक सप्ताहामध्ये रक्तदान शिबिर घेऊन 65 बाटल्याचे रक्तदान रक्त संकलन करण्यात आले श्री रोकडोबा युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवकुमार हिप्परगे, शिवा शेळके, अनिल शेळके ,शिरुभाऊ जाधव, दयानंद तराटे ,नवनाथ जाधव यांनी परिश्रम घेतले.