दैनिक चालु वार्ता भु म प्रतिनिधि
भुम:-भारतीय संविधानाचे शिल्पकार, परिवर्तनाचे अग्रदूत, जलनीतीचे उद्गाते, उत्कृष्ट संसदपटू, शिस्तप्रिय प्रशासक, कायदेतज्ज्ञ, पत्रकार, ग्रंथकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन AISF जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड अशोक माने यांनी केलं. मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे ,फकीरा दलाचे बाबासाहेब थोरात, पत्रकार फैसल काझी, गायकवाड सर लोखंडे सर, भिम नगर जयंती चे अध्यक्ष अक्षय काळखैरे ,नागराज उंदरे, मंगेश चौरे , ओम पुलावळे , नवनाथ थोरात, तसेच ईट शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गावातील सर्व पक्षीय नेते ,व्यापारी,कामगार व नागरिक तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रर्माचे सूत्रसंचालन व समारोप कॉम्रेड अशोक माने यांनी केले.