दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे.
श्रीमती शोभा व्यंकटराव मुंढे / मुसळे यांची जिल्हा परिषदेच्या वतीने मुखेड पंचायत समिती तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार 2022-23 साठी समितीच्या वतीने निवड करण्यात आली होती .
त्यांच्या गेली 16-18 वर्षा पासुन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेल्या वेगवेगळया शालेय , उपकृमाअंतर्गत , शैक्षणिक विकास , डिजीटल शाळा , स्पर्धा परिक्षा योगदान , संगीत कला मध्ये योगदान व तसेच सामीजीक कार्याचा जिल्हा परिषदेने आढावा घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती तो पुरस्कार आज दि .15/04/23 शणिवार या दिवसी भव्य दिव्य कार्यक्रमात आ. तुषार राठोड , गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी संतोष होनधरणे साहेब शिक्षण विगातील अधिकारी यांच्या हस्ते कृ.उ.बा. समिती सभापती खुशाल पाटील उमरदरीकर व प्रतिष्ठीत मान्यवर तसेच बहुसंख्य शिक्षक कर्मचारी मित्रपरिवार ,नागरीक यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र , सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .
तेंव्हा जि.प.प्रा.शा एकलारा शाळेचे मु. अ. पवार सर सर्व शिक्षक वृंद, सर्व महिला शिक्षीका, सरपंच अश्विनी ताई हिमगीरे शा . व्य . स . अध्यक्ष सौ . सुषमा शिंदे सर्व . ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ग्रामस्थ, समाज, परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या वतीने अभिनंदन करून सुभेच्छा देण्यात आल्या .