दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले छेटेचे गाव म्हणजे सावरखुट या गावात जाण्यासाठी रस्ता खडतर आहे. तरी आदिवासी कींग मुझीकल ग्रुप दापूर सावरखूट या ग्रुपचे मुले बँजो घेऊन ग्रामीण भागात सर्वत्र मागणी आहे. या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत.तसेच या ग्रुप मध्ये 20/25 मुलाचा सहभाग आहे.ते वर्ष भरात लाखो रू कमावतात ढोल, ताशा, पिपाणी, हलगी आणि गायन यांच्यावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग झाले आहेत. हल्लीच्या डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. कोणतेही मंगलकार्य असेल, तर त्यात तरुणाईचा आवडता विषय म्हणजे हळदी( तेलवण). लग्नाची वरात आणि मिरवणुकीत तर बेंजो पार्टीचा आणि सनई वाद्यांचा ताफा हवाच असतो. त्यात ढोल, ताशा, , हलगी आणि त्यासोबत आदिवासी कींग मुझीकल ग्रुप दापूर सावरखूट यांच्या गाण्यावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग झाल्याचे सध्या सर्वत्र दिसत आहे.लग्न कार्यात सनई ताफा हवाच. परंतु कधी काळी कानाला मंजुळ सुरांची साद घालत, ऐकणाऱ्याला देहभान विसरून लावणारी आदिवासी कींग मुझीकल ग्रुप दापूर सावरखूट नव्या बदलांचा वेग प्रचंड वाढला.जीवनशैली प्रचंड बदलली लग्नासारखी मंगल कार्यालयात व ग्रामीण भागातघरा मध्ये . लग्नसोहळा काही तासांचा धनी झाला. हळद, आहेर, मानपान, रुखवत, वर ओवाळणी या बाबी जशा विवाहसमारंभातूनत्याचप्रमाणे आदिवासी कींग मुझीकल ग्रुप दापूर सावरखूट बँजो पार्टी बँजो वादक कलाकार मोहन फसाळे यांचा ग्रामीण भागातुन कौतुक होत आहे.