दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम-दिनकर गडदे
दिनांक 16 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर ठिल्ली द्वारा संचालित प्रसंग करियर अकॅडमी वाशिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 132 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन अकेदमीचे संचालक डॉक्टर गजपाल पी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सतीश इंगोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साजिन पटेल सर समता दूत बार्टी समाज कल्याण वाशिम हे होते साजिद पटेल सर हे विद्यार्थ्यासोबत बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर घेण्यापेक्षा ते डोक्यात घेणे खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे आणि बार्टी केंद्रातील सर्वच प्रक्षेणार्थी ही उणीव भरून काढतील याची मला खात्री आहे व सर्व विद्यार्थी मित्राला भीम जयंतीच्या व पुढील भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश इंगोले हे मनाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन करता जमात बनायची आहे कारण आपल्या समाजाला दिशा देण्याचे काम तरुणाच्या खांद्यावर आहे मित्रांनो आपण शिकून मोठे होऊन केवळ स्वार्थ न बघता समाजाल काहीतरी देणं लागतं या भावनेपुढे आलं पाहिजे आणि समाजाचे ऋण फेडलं पाहिजे तरच आपल्या जगण्याचा अर्थ आहे नाहीतर जन्माला आलो काय मी गेलो काय काही फरक पडणार नाही यादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन करून विजय विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमात सूत्रसंचालन पल्लवी पखाली यांनी केले तर आभार प्रदर्शन बोरकर सर यांनी केले करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल राजगुरे निलेश इंगोले युवराज झरे इत्यादींनी परिश्रम घेतले.