दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::’:::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,जयंतीच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सम्यक युवा मंचाच्या वतीने अनेक उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, 14 एप्रिल रोजी सकाळी जय भिमच्या जयघोषात सावळी सदोबा येथे भव्य मिरवणूक काढूण्यात आली, या मिरवणुकीला हजारो महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती, मिरवणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले, 16 एप्रिल रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, या वक्तृत्व स्पर्धेत अनेक मान्यवरांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाची यशोगाथा सांगून समाज प्रबोधन करण्यात आले, या वक्तृत्व स्पर्धेला अनेक जिल्ह्यातील मान्यवरांनी हजेरी लावली होती,वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.गजानन गजभारे साहेब,यांच्या हस्ते झाले असून,सूत्रसंचालन अमर मानकर यांनी केले व प्रस्तावित राजू पाटील यांनी केले यावेळी मंगेश नगराळे,प्रतिक मुनेश्वर,योगेश शिवनकर,तुषार वाघमारे,प्रशिक बहादे,सम्यक नगराळे,सनि भगत,विवेक वाघमारे,वैभव रामटेके,आर्यन रामटेके,संदेश जगदाळे,अमोल वाघमारे,आदित्य वाघमारे,अदीभ बहादे,अनिल कटके,अभय बहादे,सह सावळी सदोबा परिसरातील महिला व पुरुष बांधवा उपस्थित होते.