दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील अंबिका मंदिर येथे मंगळवार 18 एप्रिल 2023 रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये 50 ते 60 सेवेकऱ्यांनी रक्तदान केले.
गंगाखेड शहरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 ते मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 या कालावधीत करण्यात आले होते.
या सात दिवसीय सप्ताहामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या आयोजना सह मंडळ स्थापना, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन करण्यात आले.तसेच नित्यस्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग,चंडी याग, गीताई यागासह सत्य दत्त पूजन अखंड नामजप यज्ञ, प्रहर सेवा रात्री 8:00 वाजल्या पासून ते सकाळी 8:00 वाजेपर्यंत पुरुष व सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत महिला अशा प्रकारे 24 तास प्रहर सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहाच्या शेवटी समर्थ सेवेकर्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून साप्ताहाची सांगता करण्यात आली.