दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी
बॅक ऑफ महाराष्ट्र व पंचायत समिती उमेद विभाग आयोजित आर्थिक साक्षरता मेळावा वडपाडा सातुर्ली येथे संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की ग्रामीण भागातील महिला आपल्या परीवाची भविष्याची काळजी घेऊनच नियोजन करत असतात फक्त गरज आहे त्यांना नवीन बॅक व शासकीय योजनांची माहिती घेऊन आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची.
महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू केला पाहिजे व त्यासाठी कर्ज व योजनांचा लाभ घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी तालुक्यातील २९ महिला बचतगटांना ४८ लाख रुपयांचे व्यवसाय साठी कर्ज वाटप करण्यात आले,त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती श्री भास्कर थेतले, उपसभापती श्री प्रदीप वाघ, गटविकास अधिकारी श्री कुलदीप जाधव, महाराष्ट्र बॅक चे संजय चौधरी, वित्तीय साक्षरता अधिकारी श्रीमती कोकणे,उमेद चे श्री सचिन मुंडे, अमोल मोहंडकर, उपसरपंच श्री नंदकुमार वाघ, बचतगट अध्यक्ष, सचिव व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.