
दैनिक चालु वार्ता वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/निलंगा:- निलंगा तालुक्यात गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी चारच्या दरम्यान वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने मोठी जीवित हानी झाली आहे. यात वीज पडून एका तेरा वर्षीय मुलीसह चार जनावरे दगावली आहेत. तर हालसी येथील हनुमान मंदिरावर वीज कोसळून मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दि २७ एप्रिल रोजी दुपारी चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विज पडून निलंगा तालुक्यातील मुबारकपूर तांडा येथील आरुषी नथुराम राठोड तेरा वर्षाची मुलगी शेतात शेळ्या चारत असताना वीज पडून जागीच ठार झाली. तर होसुर येथील शेतकरी बालाजी बिरादार यांचे शेतात झाडाला बांधलेले दोन बैल , तगरखेडा येथील धनराज हिरागीर गिरी यांची एक म्हैस वीज पडून दगावली व कर्नाटकातील भालकी तालुक्यातील तुगाव येथील धुळाप्पा बावगे यांची एक बैल अशी चार जनावरे दगावला आहे.
वीज पडून जनावरे दगावल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हालसी तुगाव येथील हनुमान मंदिरावर वीज पडल्याने गाभा-यातील भिंतीला तडे जाऊन टाइल्स निघाल्याने गाभा-याचे नुकसान झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले दरम्यान औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर २२ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी दिली.