दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
दुमदुमे ‘जयभीम’ ची, गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना
भू म:-तालुक्यातील आष्टा येथे सालाबाद प्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक उत्सव कमिटी तर्फे साजरी करण्यात आली.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ माळी, सरपंच सूनिल जाधव, ग्रा.पं.सदस्य रवींद्र वाघमारे, प्रकश वाघमारे, सतीश कदम महाराज, ग्रा.पं.सदस्य तात्यासाहेब अष्टेकर, जयराज गिलबिले,बाप्पा गिलबिले, निलेश मुळे,सोसायटी चेअरमन चंद्रकांत काकडे,व्यंकटेश काकडे,व्हाईस चेअरमन तानाजी गिलबिले,विनोद वाघमारे,रमेश वाघमारे,संभाजी नलवडे,संभाजी गिलबिले,राजकुमार घरत, ऋत्विक गिलबिले यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून निळ्या ध्वजाचा ध्वजारोहण सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांमध्ये उत्साह होता.याप्रसंगी पोलीस अधिकारी सुशील कुमार कोळेकर, पोलीस पाटील भारत गिलबिले,विजय चव्हाण,अक्षय वाघमारे, अमोल घोलप,गोरख वाघमारे, सर्जेराव घोलप,विक्रम वाघमारे,जयंती कमिटीचे अध्यक्ष सुधाकर वाघमारे,महेश वाघमारे,चंद्रकांत वाघमारे,विष्णू वाघमारे ,बालाजी सावंत ,चेतन घोलप, भीमराव सावंत, अरुण वाघमारे ,धनंजय घोलप ,बाळासाहेब वाघमारे,दादा गवळी, बाबु वाघमारे, भागवत वाघमारे यांच्यासह आष्टा ग्रामस्थ, विकास सोसायटीची संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सदस्य, युवा बांधव, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार प्रकाश वाघमारे यांनी केले.