दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील हणेगाव व परीसरात मागील पंधरा दिवसापासुन दररोज अवकाळी पाऊस वारा विजांचा गडगडाटासह तांडव चालुच असुन सध्या पावसाळ्या सारखी परीस्थिती निर्माण झाली आहे परीसरात बऱ्याच गावात शेतकरी ज्वारी भुईमुग कांदा टमाटा पालेभाज्या पिकांची लावन केला असुन शेतकरी आपला अन्न काढण्याच्या घाईत असतानाच पावसानं तांडव माजवुन हाताला आलेला अन्न नुकसान केला आहे तर अंब्याच्या झाडाला फळच शिल्लक राहीले नाहीत एप्रील महीणा संपुन बघता बघता में महीण्याला प्रारंभ झाला तरी उन्हाळ्या सारखं दिसलाच नाही, या दिवसात जागोजागी शीतपेयांच्या दुकान थाटत असतांना दिसत होते,पण याच दिवसात हिवाळ्या सारखं गारवा निर्माण झाल्याने लोक स्वेटर घालुन फिरताना दिसत आहेत या दिवसात शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त राहत असे नांगरटी, कोळपणी,नालागंडी,कचरावेचनी आदी कामें उरकण्यात शेतकरी मग्न असायचा, पण या ढगाळी वातावरण आणी विजांच्या गडगडाटाला भिऊन शेताकडे जानच नाही,याच दिवसात आनेक लग्न सोहळे पार पडायचे व्यापारी वर्गांचा उद्योग व्यवसाय चांगला व्हायचा पण या सततच्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे सर्व कामे ठप्प पडले असुन वातावरणात फेरबदल झाल्यामुळे शेतकरी व्यापारी मजुरकार आदी लोक सध्यातरी चिंताग्रस्त अवस्थेत असल्याचे दिसत आहेत.