दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका आवाळपूर
आवाळपूर:- ३०/०४/२३ रेज रविवार लाआवाळपूर इथे वीर बाबुराव शेडमाके जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले गेले दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या रोगामुळे पुर्ण जगात हाहाकार मचला होता त्यामुळे धार्मिक स्थळे व इतर ठिकाणी गर्दी करण्यासाठी सक्त मनाई केली होती,
पण हे सर्व आटोक्यात आल्यावर सर्व सुरळीत सुरु आहे म्हणून वीर बाबुराव शेडमाके जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच भारतीय सेनेत कार्यरत असलेले आमचे मित्र मनोज आळे (सैनिक), स्वप्निल कुळसंगे (सैनिक), दिलीप कुसराम (महाराष्ट्र पोलीस) , रवी मडावी (महाराष्ट्र पोलीस) तसेच नाजुका कुसराम NCC राष्ट्रपती परेड मध्ये निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला तसेच तेजस्विनी मडचापे (कोडापे) स्वाफ्ट वेअर इंजिनिअर पदी निवड, पुनम कुसराम उद्योजक निरीक्षक पदी निवड झाली, म्हणून यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ प्रविण येरमे सर वैद्यकीय अधिकारी गडचांदूर, गजानन गोदरु पाटील जूमनाके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, राहुल दादा मेश्राम, बापुरावजी मडावी गोंडवाना शिक्षण संस्था जिवती, रविन्द्र पुसाम, प्रियांका ताई दिवे सरपंच ग्रामपंचायत आवाळपूर, बाळकृष्ण काकडे उपसरपंच ग्रामपंचायत आवाळपूर, कल्पतरू कन्नाके ग्रामपंचायत सदस्य आवाळपूर,विषेश आकर्षण रेला रवी दादा मेश्राम सुपर स्टार गोंडी गायक तेलंगणा, मेघराज मेश्राम, येवनाथ मेश्राम, विकास दादा कुळसंगे, सुरेश वेलादी, वनश्री मेश्राम, बाहुबली फेम नूत्य रवी रेला व संच,
आदिवासी मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं व आपल्या समाजाचं नाव मोठं करावं असं खूप छान मार्गदर्शन डॉ प्रविण येरमे सर यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधाकर कुसराम, अजय सिडाम, संदीप पधरे, मंगेश सोयाम, प्रविण मडचापे, नरेंद्र आळे, व्ही, टी, मडावी सर, प्रदिप मडावी समाज सेवक व (पत्रकार) , महावीर मडावी, महेश सोयाम, तुकाराम कुळसंगे, मारोती पोटावी, शंकर गेडाम आणि समस्त आदिवासी बांधव उपस्थित होते विषेश महिलांनी सुध्दा खूप छान सहकार्य केले,
सूत्र संचालन संकेत कुळमेथे (वडगाव )यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश पधरे यांनी केले