दैनिक चालु वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पुं.) ता.गंगापूर शाळेत आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते तर प्रमुख पाहुणे उद्योजक अण्णासाहेब कुंभारे हे होते. कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य केशव पाटील नंदनवनकर व सोमीनाथ हिवाळे,पर्यवेक्षिका सुरोज पवार शालेय समिती शिक्षकेतर विजयसिंह परदेशी सदस्य उपस्थित होते.आज महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेत उद्दोजक श्री अण्णासाहेब कुंभारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. शाळेच्या वतीने अनिल भांड यांनी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. शाळेतील कर्मचारी श्री. दादासाहेब हजारे व श्रीमती तारामती जाधव यांचा जन्मदिवस असल्याने दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे शाळेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगाराचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. त्यानुसार श्री अण्णासाहेब कुंभारे हे आपली उपजीविका भागविण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी आले. राजूर ता.मुखेड जि. नांदेड येथून २००० साली एका कंपनीत सुरुवातीला हेल्पर म्हणून काम करत नंतर त्यांनी त्याच कंपनीत ऑपरेटर म्हणून काम केलं आणि पुन्हा स्वतःच्या आत्मविश्वासाने एक छोटसं युनिट औरंगाबाद येथे सुरु केलं आणि आज त्यांच्या कंपनीत २० व्यक्ती काम करतात. २० जणांना नोकरी दिली आहे. कोणत्याही प्रकारचा टेक्निकल शिक्षण न घेता छोटा उद्योग उभारून वीस व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. हि सर्व गोष्टींची माहिती घेऊन श्री अण्णासाहेब कुंभारे यांचा शाळेच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व सांगून अध्यक्षीय समारोप केला.सूत्रसंचालन वैशाली सपकाळ यांनी केले तर आभार शिवकुमार होनराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी सुरेश सुलताने, बी.जे.पाटील, भगवान वनारसे ,संतोष बंडेवार,सुरेश घोरबांड,गणेश गिरी,प्रल्हाद राठोड,मारोती राठोड,काळेश्वर भुरे,मनोज सुरनर,नागेश्वर,रमा आडे,सविता गोसावी,आशा साळुंके,सतीश जावळे यांनी सहकार्य केले.